Ratnagiri : मेर्वी येथे ओढ्यात बुडून एकाचा मृत्यू

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईहून मेर्वी या आपल्या गावी आलेल्या प्रौढाचा काळीकोंड येथील पाण्याच्या पऱ्यात मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा. सुमारास उघडकीस आली.

सतीश सखाराम पुजारी (५१, मूळ रा. विलेपार्ले, मुंबई सध्या रा. बेहेरेवाडी मेर्वी, रत्नागिरी) अस ओढ्याच्या पाण्यात बूडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. सतीश पुजारी हे गणेशोत्सवासाठी रविवार, २४ ऑगस्ट रोजी मुंबईहून मेर्वी या आपल्या गावी आले होते. बुधवार २७ऑगस्ट रोजी घरी गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुपारी १२.३० वा. सुमारास ते घरात कोणालाही काही न सांगता निघून गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी गावातील इतर लोकांसोबत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा गावातील अशोक बेहेरे यांच्यास आंब्याच्या बागेजवळ काळी कोंड येथील पाण्याच्या वाहत्या पऱ्यात उपड्या स्थितीत त्यांचा ते आढळून आले.

त्यांना तातडीने प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:54 PM 01-Sep-2025