रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपल्या गावी परतले असून मोठ्या उत्सवात गणपती उत्सव सुरू आहे. गणेशोत्सवानंतर गणेश भक्तांचा परतीचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने एसटी आरक्षणाचे आवाहन करण्यात आले होते. आतापर्यंत २१ हजार १३९ एसटी बसेसचे बुकिंग झाले असून त्यामध्ये १,३५५ बसेस आरक्षण, ७८४ बसेसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. परतीच्या प्रवासास सुरुवात झाली असून सोमवारी रत्नागिरी आगारातून ५ एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत. तर २ सप्टेंबर रोजी १९० आरक्षण, ३१ ग्रुप बुकिंग बसेस अशा एकुण २२१ एसटी बसेस मुंबईला जातील. रत्नागिरी विभागातून २ ते ७सप्टेंबरपर्यंत २१ हजार १३९ एसटी बसेस मुंबईला रवाना होणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्या वतीने ५ हजार २०० बसेस कोकणात सोडण्यात आल्या. त्यापैकी २९५० एसटी बसेस रत्नागिरी जिल्हयात दाखल झाल्या. मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचे प्रतिष्ठापना गणेशभक्तांनी केली. आता मंगळवारी विसर्जन होणार आहे. त्यानंतर गणेशभक्तांना मुंबईला जाण्याचे वेध लागते. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन केल आहे. आतापर्यंत २१ हजार १३९ एसटी बसेसचे बुकींग झाले आहे. उर्वरित एसटी बसेसचे ग्रुप बुकींग लवकरच होण्याची शक्यता आहे. आणखीन जादा एसटी बसेसची मागणी असल्यास गाड्या वाढवण्याच्या विचारात रत्नागिरी विभाग आहे.
गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत २१ हजार १३९ एसटीचे बुकिंग झाले असून अद्याप दोन दिवसांचा अवधी असून ज्यांनी एसटीचे तिकीट काढले नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग करावे. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून मंगळवारी २२१ एसटी बसेस मुंबईला जाणार आहेत-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
२ ते ७ सप्टेंबरपर्यंत इतक्या गाड्या रवाना होणार
रत्नागिरी विभागातून २ सप्टेंबर रोजी २२१, ३ सप्टेंबर रोजी १,१११, चार सप्टेंबर रोजी ५९२, पाच सप्टेंबर रोजी १०४, सहा सप्टेंबर रोजी ५७, सात सप्टेंबर रोजी ५४ असे एकूण २ हजार १३९ एसटी बसेस मुंबईला रवाना होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 02-Sep-2025














