Sangameshwar : माखजन आरवली परिसरात भात पसवण्यास प्रारंभ

संगमेश्वर : तालुक्यातील माखजन, आरवली पंचक्रोशीतील गावा गावात भात पसवण्यास प्रारंभ झाला आहे. शेतीला आजवर पूरक पाऊस झाल्याने सर्वदूर चांगल्या प्रकारे भात शेती पसवलेली पाहायला मिळत आहे. व पसवलेल्या भात शेती बद्दल शेतकऱ्यांच्या मनात समाधान असले तरी, पावसाचा जोर वाढल्यामुळे, मनात चिंता सतावत आहे.

भातपीक पसवायला सुरवात झाल्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास, पोल होण्याची अर्थात दाणा विरहित टर्फल होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भात पिक घटण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे धो धो कोसळणारा पासून चिंतेच कारण ठरत आहे.परिसरात हळवी व महान भात शेती चांगल्या पद्धतीने सर्वदूर पसवलेली पहायला मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 03-Sep-2025