खेड : गणेशभक्तांना परतीसाठी येथील आगारातून ३०४ जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून महाडनाका, येथील गोळीबार मैदानातून जादा गाड्या सोडण्यात येत आहेत, अशी माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.
मुंबईहून गावी येण्यासाठी येथील एसटी प्रशासनाने जादा गाड्या सोडून गणेशभक्तांची चोख व्यवस्था केली होती. परतीचा प्रवासही सुखकर करण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. ३०४ फेऱ्यांचे नियोजन करत गोळीबार मैदानात स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. मंगळवारी ६४ नियमित व जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. ३ सप्टेंबर रोजी १५३ तर ४ रोजी ८७ जादा बसफेऱ्या धावणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 03-Sep-2025










