लांजा : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असल्याने लांजा आगारातून १६८ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गणशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. या सणासुदीला मुंबईकर मंडळी मोठ्या संख्येने कोकणात आले आहेत. मंगळवारी (ता. २) गौरी-गणपतीचे विसर्जन झाले असून, त्यानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली आहे. कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी ८८, ४ ला ५१ तर ५ ला १३ आणि ६ ला २, ७ सप्टेंबरला १० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत तसेच प्रवाशांची मागणी आणि आरक्षण झाल्यास इतर जादा गाड्याही सोडल्या जातील, असे आगारप्रमुख काव्या पेडणेकर यांनी माहिती देताना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:31 04-09-2025












