खेड : तालुक्यात १ ते २७ ऑगस्टपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे १५ गावातील २०१ शेतकरी बाधित होवून त्यांना फटका बसला आहे. एकूण ८३.०९ हेक्टर भातपिकांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ऑगस्ट महिन्यातही पावसाने थैमान घातले. सलग तीनवेळा पूरसदृशस्थिती निर्माण होवून मटण-मच्छी मार्केट पुराच्या विळख्यात अडकले होते. नारंगी नदीही जलमय होवून सभोवतालची भातशेती पाण्याखाली गेली होती. यामुळे शेतकऱ्यांची भातपिकांची नासाडी झाली आहे.
तालुक्यात ७९.४९ हेक्टर क्षेत्रातील भातपिकांची नासाडी झाली आहे. तसेच ४ हेक्टर क्षेत्रावरील फळ बागायतींचे नुकसान झाले आहे. तरी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 04/Sep/2025












