रत्नागिरी : आगामी रत्नागिरी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात येत असून याबाबत ९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासमोर सुनावणी झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांनंतर आता नगर परिषद प्रभाग रचना आराखड्यांवर हरकती मागवण्यात आल्या होत्या.
३१ ऑगस्टपर्यत हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत होती. रत्नागिरी नगर परिषदेसंदर्भात ९ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रभागात झालेल्या बदलांचाही समावेश आहे. प्रभागातील आरक्षणाबाबतही काही तक्रारी आल्या होत्या. यावर गुरुवारी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासमोर सुनावणी झाली. याबाबतचा अहवाल लवकरच वरिष्ठांना पाठवला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 05/Sep/2025














