रत्नागिरी : संजय गांधी निराधार योजनेसह विविध सरकारी योजनांचा मोठा आधार जिल्ह्यातील निराधार, अपंग, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. या योजनांमुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा एकूण २३,०५० नागरिकांना लाभ मिळत आहे.
संजय गांधी निराधार योजनेत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ३,७१४ लाभार्थी आहेत. तर त्यापाठोपाठ चिपळूण ३१७३, खेडमध्ये ३१७०, संगमेश्वरमध्ये ३१५६, दापोलीत २८५८, गुहागरमध्ये २४९४, राजापूर २२२५ आणि लांजा तालुक्यात १५४८ व मंडणगड तालुक्यात ७०७लाभार्थी आहेत.
इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तिवेतन योजनेत संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यांची संख्या अनुक्रमे १५५७आणि ९४१ इतकी आहे. तर त्या खालोखाल दापोलीत ८१७, गुहागर ७३५, लांजा ७३४, राजापूर ७०५, खेड ५७०, रत्नागिरी ४८८ मंडणगड २२२ अशी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे ६,७६९ लाभार्थी आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतून मंडणगड तालुक्यात २७, दापोलीमध्ये ५२, खेडमध्ये २७, चिपळूण २६१, गुहागर ३७१, संगमेश्वर २६०, रत्नागिरी १८९, लांजा ९० तर राजापूरमध्ये ९९ लाभार्थी आहेत. तर या योजनेतून दिव्यांग निवृत्ती वेतन मंडणगडमध्ये ९, दापोलीत ३, खेडमध्ये ३, चिपळूणमध्ये ३६, गुहागर ३७, संगमेश्वर ६५, रत्नागिरी २१, लांजा ३४ तर राजापूरमध्ये २० असे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे १, ३७६ लाभार्थी आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या २२८ आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून एकूण ५२ लाभार्थीना मदत मिळाली आहे. या सरकारी योजनांचा फायदा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहे आणि गरजू लोकांना आर्थिक आधार मिळत आहे. भविष्यात या योजनांचा विस्तार करून आणखी लोकांना समाविष्ट करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 06-Sep-2025












