रत्नागिरी : हातिवले (ता. राजापूर) टोल नाक्यावर उभा असणाऱ्या ट्रकला मोटारीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या या अपघातात राजेश शेखर नायडू (वय ३५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातग्रस्त महेंद्रा मराझो मोटार (क्र. एमएच 02,इ झेड 4748) मुंबईतून मालाडहून भिरकोंड (ता. कणकवली) निघाली होती. त्यातून सहाजण प्रवास करीत होते. ते कणकवलीत नातेवाईकांकडे चालले होते. वाटेत त्यांनी चहा-अल्पोपाहार केल्यावर ते पुढे निघाले असता हातिवले येथील टोल नाक्यावर त्यांची मोटार पोहोचली. तेथे उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम एच 10 ए डब्ल्यू 8144) महेंद्रा मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू ओढवला. अन्य पाच जण जखमी झाले. सर्व जखमीना राजापूरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून पुढे त्यांना कणकवलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी, मदतीसाठी मुन्ना खामकर, राजू कुरूप, नरेन कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर, संदीप राऊत दाखल झाले. त्यांनी मदतकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 06-09-2025












