रत्नागिरी : पुण्यातील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा रत्नागिरीत ७ व ८ ऑक्टोबरला होणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामधील वरिष्ठ महाविद्यालयीन संघांना सहभागी होता येईल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाट्यगुणांना सकस व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेली ५९ वर्षे ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होत आहे.
स्पर्धेचे यंदा ६० वे वर्ष आहे. सन २०१० पासून ही स्पर्धा, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी आणि नागपूर या केंद्रांवर ही स्पर्धा होत आहे. यावर्षी ही स्पर्धा ७ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील अधिकाधिक महाविद्यालयांनी सहभागी व्हावे. या स्पर्धेचे वेळापत्रक २७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.
एकांकिका स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज स्पर्धेचे नियम व अटी यासाठी तसेच अधिक माहितीसाठी गौरी महाजन आणि संदीप जोशी यांच्याशी संपर्क साधावा. या एकांकिका स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रत्नागिरी केंद्र संयोजक संदीप जोशी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 15/Sep/2025














