Ratnagiri : दिवाळीत पोस्टाद्वारे परदेशात फराळ पाठवण्याची सुविधा!

पावस : जिल्ह्यातील अनेक मुले तसेच नागरिक शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात आहेत. त्यांना दिवाळीत घरचा फराळ मिळावा यासाठी टपालखात्याने परदेशात फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

फराळ परदेशात पाठवण्यासाठी काही निवडक देशांसाठी ५ किलो पार्सलचे दर ठरवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया ४ हजार ९९७ रुपये, कॅनडा ५ हजार २६ रुपये, युएई १ हजार ८९९ रुपये, युके ४ हजार ५३७ रुपये आणि जर्मनी ३ हजार ६९९ रुपये.

या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पार्सल पाठवता येतील. त्यासाठी इच्छुकांनी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी केले आहे. रत्नागिरी व चिपळूण प्रधान डाकघर येथे फराळ पॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 09/Oct/2025