रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या नियोजनाखाली आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी ग्रामस्थांना आयोडीनचे महत्त्व आणि त्याची कमतरता झाल्यास होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. निवेंडकर यांनी सांगितले की, शरिरातील आयोडीनची कमतरता झाल्यास गळगंड, मानसिक विकासात अडथळा, बालकांमध्ये बौद्धीक विकृती असे विकार होऊ शकतात. त्यामुळे रोजच्या आहारात आयोडीनयुक्त मीठाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 17/Oct/2025














