Dapoli : हर्णे येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे-राजवाडी येथील वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याबद्दल दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णे येथील कौशिक दुबळे हे आज सकाळी त्यांचे आजोबा जयवंत भागोजी दुबळे (वय ८०) यांना अंघोळीसाठी गरम पाणी व नाश्ता देण्यासाठी त्यांचे घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता.

कौशिक घराचा दरवाजा ढकलून आत शिरला असता त्याला त्याचे आजोबा घराच्या स्वयंपाक घरातील ओट्यावर असलेल्या भालाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 31/Oct/2025