Uday Samant | कामाच्या नोंदीवरच उमेदवारी : पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण : पालकमंत्र्यांच्या गाडीत फिरलो, जवळ बसलो, उजवा-डावा म्हणून नाव घेतलं गेलं म्हणून उमेदवारी नक्की मिळेल, अशा कोणत्याही भ्रमात राहू नका. लोकांमधून मागणी आणि कामाची नोंद यावरच उमेदवार निश्चित होईल. एका जागेसाठी अनेक इच्छुक असतील तर थांबायची तयारी ठेवा, असे स्पष्ट वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

चिपळूण शहरातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात शहर व तालुका शिवसेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामंत यांनी इच्छुकांची नावे ऐकून घेतली तसेच त्यांच्याशी संवाद साधला. महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अनेकांची इच्छा आहे; मात्र निष्ठेने व लोकांमध्ये स्वीकृती असलेल्या उमेदवारालाच संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षण झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर निवडणुकीचे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अर्चना कारेकर यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गटात) प्रवेश केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 03/Nov/2025