Rajapur Nagar Parishad : राजापुरात तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या दिवशी एकही अर्ज सादर करण्यात आलेला नाही. दरम्यान, या तीन दिवसांमध्ये केवळ ज्योती सुनील खटावकर यांनी अपक्ष (हिंदू महासभा) म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७नोव्हेंबर असून उर्वरित दिवसांमध्ये किती अर्ज दाखल होतात त्याकडे आता समस्त राजापूरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासहित एकूण दहा प्रभागातील २० जागांसाठी प्रचंड चुरस पाहावयास मिळत आहे. राजापूर चे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून त्या पदासाठी जोरदार चुरस पहावयास मिळत आहे. राजापूर शहरातील काही महिला नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असून अखेरच्या क्षणी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीसाठी रिंगणात कोण उमेदवार राहतात त्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.

तसेच दहा प्रभागातून वीस जागांसाठीदेखील मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असल्याने या दरम्यान किती उमेदवार नगराध्यक्ष पदासह २० जागांसाठी अर्ज दाखल करतात त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 13/Nov/2025