रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या (Ratnagiri Municipal Election) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाची (Mahayuti Seat Sharing) एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नगरसेवक उमेदवारांची यादी (BJP Candidate List) ‘रत्नागिरी खबरदार’च्या हाती आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या यादीनुसार, प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भाजपला नगरसेवक पदासाठी अखेर ‘फक्त’ ६ जागाच मिळाल्या आहेत.
या यादीसोबतच एक मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ (Political Twist) देखील समोर आला आहे. भाजपचे एक प्रबळ दावेदार, ज्यांना यादीत स्थान मिळालेले नाही, ते आता थेट शिवसेनेच्या (Shiv Sena) तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाटाघाटीत उदय सामंतांची सरशी?
काल (गुरुवारी) रात्री उशिरापर्यंत महायुतीच्या जागावाटपावर आणि उमेदवारांच्या नावांवर खलबते सुरू होती. या चर्चेनंतर आणि प्रदीर्घ वाटाघाटीनंतर, अखेर भाजपला केवळ सहा जागांवर समाधान मानण्यास लावण्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना यश आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
भाजपची ६ उमेदवारांची यादी (सूत्रांनुसार)
‘रत्नागिरी खबरदार’ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला आलेल्या ६ जागांवर खालील उमेदवारांना संधी मिळाली आहे:
- प्रभाग १: नितीन जाधव
- प्रभाग १०: राजू तोडकर
- प्रभाग १०: मानसी करमरकर
- प्रभाग ११: समीर तिवरेकर
- प्रभाग ११: सुप्रिया रसाळ
- प्रभाग १५: वर्षा ढेकणे
‘कहानी मे ट्विस्ट’: सुशांत चवंडे शिवसेकडून लढणार?
या संपूर्ण जागावाटपातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग क्रमांक १५ मधील घडामोड.
यादीनुसार, प्रभाग १५ मधून भाजपने वर्षा ढेकणे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, याच प्रभागातून भाजपचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सुशांत चवंडे (Sushant Chavande) यांना भाजप कडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. कारण प्रभाग १५ मधील दोनही जागा शिवसेना सोडण्यास तयार नव्हती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कडून उमेदवारी मिळत नसल्याने सुशांत चवंडे हे आता थेट शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणांकडे लागले आहे.














