संगमेश्वर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर आरामबसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला आहे. सखाराम बाळू दाभोळकर (वय ४५, रा. विरार, पालघर) असे मृत प्रवाशाचे नाव असून, ही घटना १३ नोव्हेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. सखाराम दाभोळकर मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आरामबसमधून प्रवास करत होते.
प्रवासादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने बसचालक सचिन गोविंद शेट्ये यांनी तत्काळ बस आरवली गावात थांबवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याची नोंद संगमेश्वर पोलिसात झाली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 14/Nov/2025














