रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन

रत्नागिरी : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. या दिवसाचे औचित्य साधून गुरुदेवांच्या स्मृतीप्रित्यर्थ म्युरलचे ठिकाणी रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले.

टागोर यांना १३ नोव्हेंबर १९१३ रोजी त्यांना नोबेल जाहीर झाले. नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. बंगाली संस्कृतीचा साऱ्या जगाला परिचय करून देणाऱ्या रवींद्रनाथांनी साहित्य, संगीत, चित्रकला आणि शिक्षणक्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहता कामा नये, अशी त्यांची भूमिका होती. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला.

तर भारताचे जन-गण-मन बांगलादेशाचे आमार शोनार बांगला ही दोन्ही राष्ट्रगीताचे रवींद्रनाथ टागोर रचेते होते. श्रीलंकेचे राष्ट्रगीत त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन लिहिले आहे. या अभिवादन कार्यक्रमास अॅड. अवधूत कळंबटे, अॅड. राजेंद्र पटवर्धन, अॅड. सचिन रेमणे, अॅड. नीलेश घैसास, अॅड. विजय झाडगावकर, अँड. तुषार भाटकर, अॅड. अमित सोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 15/Nov/2025

infigo