पावस : तालुक्यातील रनपार बंदरामध्ये ५ जूनला गोव्यावरून बेलापूरला निघालेले बार्ज तांत्रिक अडचणीमुळे भरकटलेले होते. अखेर त्याची दुरुस्ती होऊन बेलापूरला रवाना झाले. गोव्यावरून समुद्रमार्गे बेलापूरला जाण्यासाठी बार्ज व टग निघालेले असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ५ जूनला रनपार बंदरामध्ये भरकटले.
त्यानंतर संबंधित मालकाने दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले; परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी आल्या होत्या. चार दिवसांपूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर व त्यांना जाण्यासाठी परवानगी मिळाली. त्यामुळे शनिवारी (ता. १५) पहाटेच बार्ज बेलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 17/Nov/2025














