लांजा : कोत्रेवाडी डंपिंग ग्राऊंडविरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता विराम देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला बाधा येऊ नये, तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
१४ ऑगस्टपासून सलग सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला तब्बल ९३ दिवस झाले आहेत. या काळात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाकडून डम्पिंग ग्राऊंडविरोधातील आक्रोश सातत्याने नोंदवला होता. आचारसंहिता लागू होताच लांजा पोलिसांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार ग्रामस्थांनी सायंकाळी ७.३० वाजता उपोषण स्थगित केले. या वेळी पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे आणि मुख्याधिकारी अभिजित कुंभार उपस्थित होते. ग्रामस्थांचा लढा अद्याप संपलेला नाही. आचारसंहिता संपताच उपोषण पुन्हा सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 17/Nov/2025














