Vaibhav Khedekar | खेड नगरपरिषद निवडणूक महायुतीच म्हणून लढणार : वैभव खेडेकर

खेड : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुती मध्ये सर्वकाही ठीक नाही असे म्हटले जात असतानाच रोजी चमत्कारिकरित्या मनोमिलन दिसून आले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपचे रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक संयोजक वैभव खेडेकर युतीच्या चर्चेपासून दूर राहिले होते. त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची भेट घेतली व युती धर्म पाळणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युती विरुद्ध आघाडी लढत रंगणार, असे थेट चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील महायुतीचा पहिलाच नगराध्यक्षपदाचा उमेदवारीअर्ज देखील खेड नगर परिषदेसाठी ना. योगेश कदम यांच्या उपस्थितीत दाखल झाला होता. अर्ज दाखल करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती; मात्र भाजपत दाखल झालेले शहराच्या राजकारणात प्रभाव असलेले भाजपचे रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक संयोजक वैभव खेडेकर हे या प्रक्रियेदरम्यान गैरहजर असल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

याच पार्श्वभूमीवर २० रोजी वैभव सखेडेकर यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेडमध्ये होणारी निवडणूक शिवसेना व भाजप तर्फे युतीने लढवण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे दिसून लागले आहे. शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चाना या भेटीने पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता असल्याने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारामध्ये चुरस रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एक भारतीय जनता पक्षाच्या नावाने तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते. मात्र छाननीदरम्यान त्यांचा भाजपकडून भरलेला अर्ज अवैध ठरला असून अपक्ष उमेदवारी वैध घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे वैभव खेडेकर कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पण त्यांनी शिवसेना नेत्यांची घेतलेली भेट हा विषय राजकीय कोडे सोडवणारा ठरला आहे. महायुतीत भाजपला खेड नगर परिषदेत तीन जागा मिळाल्याचेही वैभव खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. नगराध्यक्षपद आणि सदस्यपदांसाठी दाखल केलेल्या अर्जाची छाननी आता पूर्ण झाली असून अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत खेडच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय हालचाली दिसून येतील का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आजच्या या महत्वपूर्ण भेटीमुळे महायुतीत मनोमिलन झाल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 21-Nov-2025