Ratnagiri : जिल्ह्यात थंडी ओसरली…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला होता. दापोली, लांजा, राजापूर, चिपळूणसह अन्य तालुक्यांत हुडहुडी वाढली होती. मात्र आता मागील दोन दिवसांपासून किंचतशी थंडी कमी झाली आहे. तर दिवसभर उन्हाचे चटके बसत असून उकाडा जाणवत आहे.

रात्रीही उकाडा असून नागरिक घामाघूम होत आहेत. तर पहाटे थंडी जाणवत असून धुकेच धुके दिसत आहे. विशेषतः दापोलीत पारा कमी झाला होता. लांजा, राजापूर, चिपळूणसह अन्य तालुक्यांत थंडी लागत होती. मात्र आता मागील दोन दिवसांपासून शहरासह काही तालुक्यात उकाडा जाणवत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 24/Nov/2025