Ratnagiri : निवळी – जयगड मार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दोघे जखमी

रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात दुचाकीवरील दोघांना दुखापत झाली असून अज्ञात ट्रक चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची ही घटना शनिवार २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावरील ओरी गावातील हॉटेल इंद्रधनू हॉटेल समोर घडली. या अपघातात अंकुश छोटे पाटकर आणि संदेश धोंडू घाणेकर (दोन्ही रा. आगवे घाणेकरवाडी, रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी अंकुश पाटकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-१०-टी-८०८७) व पाठीमागे संदेश घाणेकरला घेउन ओरी ते आगवे असा जात होता. त्यावेळी समोरुन येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात दोघेही जखमी झाले असून ट्रक चालकाने न थांबता पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 24/Nov/2025