Ratnagiri : निरुळ- ठिकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात म्हैस ठार

पावस : तालुक्यातील निरुळ- ठिकवाडी येथे बिबट्याने रामचंद्र धोंडू माटल यांच्या म्हैशीवर हल्ला करून तिला ठार केले. या परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती तातडीने वनरक्षक विराज संसारे, पशुवैद्यकीय अधिकारी कल्याण नवले, ग्राममहसूल अधिकारी मयुर पानसरे, पोलिसपाटील नीलेश ठीक, उपसरपंच शांताराम नावले, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल ठीक, गणेश ठीक आदींनी दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 24/Nov/2025