साडवली : रत्नागिरीहून सात वाजता देवरूख बस सुटते ती निव्याला पूर्वी आठ वाजता यायची. त्यानंतर रत्नागिरीहून साडेसात वाजता दुसरी बस सुटायची. त्यामुळे दोन्ही बसमध्ये प्रवासी विभागल्याने गर्दी नसायची; मात्र आता साडेसातची रत्नागिरी-देवरूख बस बंद झाली. त्यामुळे सात वाजता सुटणाऱ्या बसने सर्व प्रवासी येत असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या संदर्भात आंबव कॉलेज, निवे आश्रमशाळा व पंचक्रोशीच्या सरपंचांनी निवेदन दिले तरी रत्नागिरीहून साडेसात वाजता सुटणारी बस सुरू केली जात नाही.
सात वाजल्यानंतर रत्नागिरीहून आठची बस सुटते. तिला देवरूखला येणाऱ्या रत्नागिरीच्या कर्मचाऱ्यांची गर्दी असल्याने ती निवेपासून पुढे कोठेही थांबत नाही. इतर लोकल येणाऱ्या बसेस अनेकवेळा देवरूखमधून उशिरा सोडल्या जातात. त्यामुळे तुळसणीपासून पुढे जाणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय होते. रत्नागिरीहून सात वाजता सुटणारी रत्नागिरी-देवरूख बस एकच असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रत्नागिरीहून सुटणारी साडेसातची बस पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 24/Nov/2025












