Maha TET EXAM : जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रत्नागिरी जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर सुरळीत पार पडली. या परीक्षेला २६२ जणांनी दांडी मारली होती. परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या केंद्रावर अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा रत्नागिरी शहरातील दहा केंद्रावर झाली. पहिला पेपर सकाळी १०.३० ते १ या वेळेत झाला. पहिल्या पेपरसाठी केंद्रावर १ हजार ४७० परीक्षार्थीनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ६३३ परीक्षार्थी उपस्थित राहिले आहेत.

एकूण या पेपरला १२९ जणांनी दांडी मारली होती. तर दुसरा पेपर हा २.३० ते ५ या वेळेत झाला. यासाठी १ हजार ९४३ परीक्षार्थींपैकी १ हजार ८३३ परीक्षार्थी उपस्थित होते. यामुळे १३३ जणांनी दांडी मारली होती. या परीक्षेमध्ये २० टक्के प्राथमिक शिक्षक असल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव व अन्य अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्याचबरोबर भरारी पथकांच्यासुद्धा भेटी केंद्रांना झाल्या. या सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती. कुठेही अनुचित व गैरप्रकार घडला नाही. सर्वच्या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 25/Nov/2025