दापोली : दापोली तालुक्यात हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. एकूण ५१२.३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यापैकी भात पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यात भाताचे ४६७.९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
दापोली तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे यांनी सांगितले की, भातासाठी हेक्टरी ८,५०० रुपये आणि फळबाग, सुपारी, नारळ यांसारख्या पिकांसाठी हेक्टरी २२,५०० रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त पिकांमध्ये नागली ३३.९० हेक्टर, भाजीपाल १.०९ हेक्टर आणि फळपीक ९.०७ हेक्टर यांचा समावेश आहे. एकूण ४९ लाख २३५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 25/Nov/2025












