Dapoli : शिवाजीनगर-साखळोली पुलावरती मलमपट्टी!

दापोली : तालुक्यातील शिवाजीनगर साखळोली नं. १ या गावांना जोडणाऱ्या नदीपुलाची अवस्था अतिशय दयनीय बनली होती. एका वृत्तपत्रकाने या विषयावर सातत्याने आवाज उठवला. त्यानंतर अखेर दापोली जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला जाग आली. मात्र करण्यात आलेली दुरुस्ती ही वरवरची आणि तात्पुरती असल्याचे चित्र आहे. पुलाची खरी आणि सक्षम दुरुस्ती करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याची माहिती पुढे येत असून, त्यामुळे नागरिकांचा रोष अधिकच वाढत आहे.

शिवाजीनगर साखळोली नं. १ या गावांना जोडणाऱ्या नदीपुलाची अवस्था अतिशय दयनीय बनली होती. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर येणे, तसेच पुलाच्या मधोमध पडलेला मोठा खड्डा यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. गावतळे टाळसुरे परिसरातील अनेक गावांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने पुलाची झालेली दुरवस्था यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी होती.

२०१६ मध्ये बांधलेला हा पूल फक्त आठ वर्षांतच खराब अवस्थेत का आला? हा प्रश्न वाहनचालक आणि स्थानिक नागरिक सातत्याने उपस्थित करत आहेत. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या नव्या पुलाची इतक्या कमी कालावधीत झालेली झपाट्याने दुरवस्था ही बांधकामातील त्रुटीचे स्पष्ट लक्षण असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 25/Nov/2025