रत्नागिरी : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत रत्नागिरी नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती सायबर पोलिस ठाण्यामार्फत घेउन त्यांचा शोध घेउन ते नागरिकांना विशेष पोलिस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर रोजी परत करण्यात आले.
या गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, पोलिस शिपाई अजिंक्य ढमढेरे यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस अंमलदार यांनी एकत्रित काम करुन शोध घेतला.
या प्रक्रियेत एकूण १८७ मोबाईलचा शोध घेऊन ते परत मिळवण्यात पोलिस दलाला यश आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे (भा. पो. से.) यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. तसेच सायबर क्राईमसारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस निरीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी लांजा सुरेश कदम व पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 26/Nov/2025














