रत्नागिरीत फळांची आवक वाढली!

रत्नागिरी : हिवाळा ऋतू सुरू झाला असून, या थंडीच्या वातावरणात विविध फळांना मोठी मागणी असते. रत्नागिरीत सीताफळ, अननस, पेरू, संत्री, मोसंबीची मोठी आवक झाली आहे. काही किरकोळ व्यापारी बाजारपेठेत, रस्त्याकडेला फळांची विक्री करीत आहेत. रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करीत आहेत.

थंडीच्या दिवसात सर्दी, खोकल्यापासून बचाव करण्यासाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध फळे नागरिक सेवन करीत असतात. विशेषकरून सीताफळ, संत्री, मोसंबी, अननस, पेरू, ड्रॅगनफ्रूट, किवी, चिक्कू ही फळे खरेदी करीत आहेत. काही व्यापारी गाडी भरून अननस, पेरू, मोसंबी विक्री करीत असून रत्नागिरीकर मोठी गर्दी करून खरेदी करीत आहेत.

सध्या बाजारात केळी – ५० ते ६० रुपये डझन तसेच अननस -१०० रुपये, ड्रॅगनफ्रूट १०० ते १५० रुपये, संत्री १३० ते १६० रूपये, मोसंबी १०० ते १५० रुपये, सीताफळ १०० रुपये, किवी १२० रुपये प्रतिकिलो व पेरू १०० रुपये दीड किलो असे विकले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 26/Nov/2025