पाचल : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुपची नुकतीच मौजे कोळवडीखडी येथे स्थापना करण्यात आली असून, या बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने २ डिसेंबर रोजी पाचल ग्रामपंचायतीमध्ये सकाळी १० वाजता बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यास गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी मोहन नारकर व बांबू उत्पादक मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात बांबू लागवड ते विक्री व्यवस्थापन, बांबू उत्पादक शेतकऱ्यांची बांबू उत्पादक कंपनी स्थापन करणे, रोपवाटिका तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, शेतकरी हमीभाव, व शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करणे आदी विषयांवर ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील बांबू लागवड शेतक-यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहाण्याचे आवाहन शेतकरी ग्रुपच्या वतीने मोहन नारकर व सुहास मोरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 27/Nov/2025














