रत्नागिरी : तालुक्यातील खानू येथील डॉ. संदीप बबन कांबळे यांची महाराष्ट्र राज्य सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा नियामक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. राज्यातून दोन शेतकरी सेंद्रिय शेतीतील अनुभवी तज्ज्ञ म्हणून त्यांची निवड झाली असून, सेंद्रिय शेती क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्याला राज्याच्या सर्वोच्च धोरणात्मक मंडळावर स्थान मिळाल्याने डॉ. कांबळे यांचे कौतुक होत आहे.
नियामक मंडळाच्या तरतुदीनुसार, डॉ. कांबळे यांचा पद कालावधी दोन वर्षांचा असेल. या कालावधीत ते राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांना देखील प्रमाणीकरण प्रक्रियेत येण्यासाठी प्रतिनिधी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतील. नियुक्तीनंतर मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता अपर मुख्य सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
राज्यातील शेतकरी कंपन्या व शेतकरी गटांना जास्तीत जास्त झाला पाहिजे, म्हणून प्रमाणीकरण फी सर्वसाधारण शेतकऱ्यांनादेखील परवडली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच दुसरी बैठक होईल व त्यात प्रमाणीकरण प्रक्रिया व शुल्काबाबत योग्य तो निर्णय होऊन अंमलात आणला जाईल.
देश व विदेशात सेंद्रिय मालाला असलेली प्रचंड मागणी पाहता जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक प्रमाणीकरण प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मालाला निश्चित भाव मिळवावा व निसर्गाचे संतुलन राखा- डॉ. संदीप कांबळे, खानू
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 28/Nov/2025














