Khed : रामजीवाडी येथील प्रौढाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

खेड : तालुक्यातील रामजीवाडी, खोपी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बाबाराम मालसिंग ढेंबे (वय ३६) यांचा पिंपळवाडी लपा योजना खोपी-खेड येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास ढेंबे हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेले होते.

म्हशींना पाणी पाजण्यासाठी ते धरणात उतरले असता, त्यांचे पाय चिखलात रुतले आणि ते बाहेर पडू शकले नाहीत. यातच ते बुडू लागले आणि काही वेळातच त्यांची हालचाल थांबली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७.२९ वाजता आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 28/Nov/2025