Devrukh : रिक्षातून उतरताना पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

देवरुख : रिक्षामधून उतरत असताना घराच्या संरक्षक भिंतीच्या गेटसमोर पडून जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. काशिनाथ रामचंद्र जोगळे (वय ६०, रा. अमृतनगर -देवरुख, संगमेश्वर) असे त्यांचे नाव आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ते वीजबिल भरण्यासाठी देवरुख येथे गेले होते. ते रिक्षातून घरी आले आणि उतरताना पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 29/Nov/2025