रत्नागिरी : शहरानजीकच्या एकतानगर-खेडशी येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. नम्रता बाळासाहेब अकिवटे (वय ३३, रा. एकतानगर, खेडशी, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता यांनी राहत्या घरी छताच्या पंख्याला नायलॉनची साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 06/Dec/2025












