रत्नागिरीत जानेवारीत रंगणार कीर्तन महोत्सव; कीर्तनकार चारूदत्त आफळेबुवा उलगडणार महाभारताचे आणखी काही पैलू

रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्ष रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येल्या जानेवारीमध्ये ‘महाभारत’ या विषयावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे हे उलगडून दाखवणार आहेत. यंदाचे या कीर्तन महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे.

२०१२ पासून गेली चौदा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. रामायणानंतर ‘महाभारत’ या प्राचीन भारत आणि जगातील सर्वांत मोठ्या महाकाव्यातील काही भाग गेल्या वर्षीच्या महोत्सवात सादर करण्यात आला होता. महाभारत ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ इसवीसनपूर्व २००० इतका मागे जाऊ शकतो, महाभारत हे महाकाव्य असून, ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. मात्र ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगीकारावी, महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते, या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष गुणविशेष दर्शवले आहेत. या साया इतिहासाचा सुरुवातीचा काही भाग आफळे बुवांनी गेल्या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवाव समजावून सांगितला होता.

हा महोत्सव ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे होणार आहे. नीटनेटके आयोजन, प्रशस्त बैठक व्यवस्था असणारा हा कीर्तनसंध्या महोत्सव आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत प्रवचनकार धनंजय चितळे यांची १८ लेखांची ओळख महाभारताची’ ही संक्षिप्त लेखमालादेखील सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली जाणार आहे. भीम आणि मारुती, अजगराच्या विळख्यात भीम, जयद्रय आणि युधिष्ठिर, विदूरनीती, भीष्म पितामहांकडून युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश, महाभारत संबातील राजकारण, तेजस्वी द्रौपदी, सत्यप्रिय गांधारी, मारवी अर्जुन, देवव्रत भीष्म, भगवान श्री परशुराम, महती महाभारताची, महाभारत आणि आपली कर्तव्ये, महाभारतातील काही सुभाषिते, महाभारतातील भाषा आणि विचार सौंदर्य असे या लेखमालेचे विषय असतील. या लेखमालेचा आणि कीर्तनसंध्या महोत्सवाचा कीर्तनप्रेमींनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

व्याख्यानमाला होणार…
कीर्तनसंध्या महोत्सवाच्या बातावरण निर्मितीसाठी रत्नागिरीत येत्या २० आणि २९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे यांनी ‘विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत’ ही दोन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राहाण संघ आणि कीर्तनसंध्या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने झाडगांव येथील कन्हाडे ब्राह्मण सहकारी संघ मर्यादित येथे होणार आहे.
पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 09/Dec/2025