पाकिस्तानमधून शीत लहरी; महाराष्ट्रात थंडी

मुंबई: पाकिस्तानसह लगतच्या देशाकडून भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे उत्तर भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी पडली आहे. पुढील २४ तास या गारव्याचा प्रभाव कायम राहणार असून, त्यानंतर मात्र तापमानात वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच मुंबईचा पारा बऱ्यापैकी वाढला होता. या काळात कमाल तापमान ३४ हाेते.

किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

मुंबई १५.९, ठाणे १८.८, डहाणू १५.३, नाशिक ११.४, महाबळेश्वर १३.१, पुणे १२.७, अहिल्यानगर १४.६, बीड १५, नंदुरबार १३.५, माथेरान १२.२, जालना १५.४, बारामती १३.४, जेऊर १३.५, जळगाव ११.८

Tata nexon

सोमवारी अनेक ठिकाणी एकांकी किमान तापमान हाेते. तीन दिवसांनी तापमानात हलकी वाढ होईल. २३ आणि २४ जानेवारीला तापमान कमी राहील.
-कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

उत्तर-पश्चिमेकडील वाऱ्यामुळे उत्तरेसह मुंबई व महाराष्ट्राच्या किमान तापमानात घसरण झाली. मुंबई १५ अंश तापमान नोंदविण्यात आले असून, मंगळवारही गारवा कायम राहील.
-अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 20-01-2026