आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२६

मेष- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल.

एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.

वृषभ- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल.

मिथुन- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश – कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे.

Khabardar diwali fest

कर्क- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

सिंह- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज कुटुंबातील वातावरण वाद – विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल.

कन्या- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

तूळ- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल.

धनु- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल.

मकर- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर – सट्टा ह्यात धन लाभ होईल.

कुंभ- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी – व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

मीन- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 11-02-2026