बेळगाव : बेळगावात मराठींवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला जाणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही.
तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी घातली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत चांगलेच भडकलेत.
उदय सामंत यांनी काँग्रेसला हा वाद सोडवायचा नाही, अशी टीका केली. मराठींवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे आणि मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
बेळगाव प्रकरणामागे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार आहे. काँग्रेसने हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. बेळगाव प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करू, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. मी किंवा आमचे काही सहकारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना भेटायला बेळगावला जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 10/Dec/2024