रत्नागिरी : कोकणनगर येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक

Jun 13, 2024 - 12:15
Jun 13, 2024 - 12:19
 0
रत्नागिरी : कोकणनगर येथे  बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर  बैठक

रत्नागिरी : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोकणनगर येथील पोलिस चौकीत सोमवार, दि. १० जून रोजी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बकरी ईद हा सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलिस निरीक्षक तोरसकर यांनी केले.

बकरी ईदचा हा सण शहरासह ग्रामीण भागात मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे, सोशल मीडियाचा गैरप्रकार टाळावा, चुकीचे संदेश, मेसेज, काही पोस्ट फॉरवर्ड न करता तत्काळ डिलीट कराव्यात, धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस, पोस्ट याबाबत प्रतिक्रिया न देता त्याबाबत सजग राहून त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक तोरसकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow