रत्नागिरी : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसतिगृहात प्रवेश सुरू

Jun 14, 2024 - 11:21
 0
रत्नागिरी : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसतिगृहात प्रवेश सुरू

रत्नागिरी : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये मंजूर मुला-मुलींचे (एकूण २) वसतिगृह नव्याने सुरू झाले आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशांसाठी संबंधित वसतिगृहामध्ये अर्जांचे वाटप सुरू आहे. इच्छुक व पात्र विद्यालयीन विद्यार्थ्यांनी गृहपाल यांच्याकडून वसतिगृह प्रवेश अर्ज घेऊन तात्काळ भरून संबंधित वसतिगृहात जमा करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वसतिगृहात अर्ज उपलब्ध आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो. या वसतिगृहामध्ये शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. प्रवेश घेण्याकरिता संबंधित वसतिगृहात संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow