चिपळूण : खेरशेत टोलनाक्यावर विजेची व्यवस्था करण्यासाठी ठेकेदार कंपनीला सूचना

Jun 14, 2024 - 11:45
Jun 14, 2024 - 13:49
 0
चिपळूण : खेरशेत टोलनाक्यावर विजेची व्यवस्था करण्यासाठी  ठेकेदार कंपनीला सूचना

चिपळूण : खेरशेत येथे उड्डाणपूल परिसरात अपघात होऊ नये म्हणून विजेची व्यवस्था करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला दिली आहे. त्यामुळे या भागात अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

खेरशेत येथील टोलनाका परिसरात रात्री अपघात होतात. प्रामुख्याने दुवाचाकीच्या अपघातांची संख्या अधिक आहे. टोलनाक्यावर दोन मार्ग वाहतुकीसाठी खुले असून, दोन मार्गावर गर्डर ठेवण्यात आले आहेत. रात्री येथे अंधार असल्यामुळे रस्त्यावर असलेले गर्डर वाहनचालकांना दिसत नाहीत. दुचाकी गर्डरवर आढळते आणि अपघात होतात. यामध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात खेरशेत टोलनाका परिसरात दोन अपघात झाले. एका अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, दुसऱ्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर खेरशेतमधील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चिपळूण कार्यालयावर धडक दिली आणि टोलनाका परिसरातील दूर करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी टोलनाका परिसरात विजेची व्यवस्था करण्याची सूचना कंपनीला केली आहे.

टोलनाका परिसरात विजेची व्यवस्था करण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे. खेरशेत येथे टोलनाका परिसरात वीज नसत्यामुळे अपघात होतात. या संदर्भात टोल कंपनीला सूचना केलेली आहे. अपघात टाळण्यासाठी तशा सूचना दिल्या आहेत. राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

खेरशेत येथे टोलनाका परिसरात एका अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब गरीब असून, त्याच्या पश्चात आई-वडील, दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. टोल कंपनीच्या चुकीमुळे त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यामुळे टोल कंपनीने त्याच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी अपेक्षा आहे. पंकज सावंत, खेरशेत, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow