मॉन्सूनने देश व्यापला..!
![मॉन्सूनने देश व्यापला..!](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202407/image_870x_66862d55193a5.jpg)
पुणे : नैर्ऋत्य मौसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २) सर्व भूभाग कवेत घेत देश व्यापला आहे.
यंदा केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ६ दिवस अगोदर देश व्यापला आहे. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी ८९ टक्के पाऊस झाला असून, आता देशात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा मॉन्सूनची वाटचाल काहीशी वेगवान झाल्याचे दिसून आले. १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर 'रेमल' चक्रीवादळाचा प्रभाव पडला. त्यामुळे मॉन्सूनने बंगालच्या उपसागर आणि पूर्वोत्तर राज्यात वेगाने वाटचाल केली. केरळमध्ये दोन दिवस आधी (३० मे) दाखल होणाऱ्या मौसमी वाऱ्यांनी ३१ मे रोजी तब्बल ६ दिवस आधीच पूर्वोत्तर राज्यात हजेरी लावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 04-07-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)