Ratnagiri : नाचणे शाळेतील मुलांचा प्रवेश चक्क घोडागाडीतून....

Jun 15, 2024 - 10:34
 0
Ratnagiri : नाचणे शाळेतील मुलांचा प्रवेश चक्क घोडागाडीतून....

रत्नागिरी : नाचणे नं.१ शाळेतील मुलांचा शाळा प्रवेश चक्क घोडागाडीतून झाला. यावेळी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी प्रा.सुधाकर मुरकुटे, लेखा अधीक्षक नागवेकर, कोतवडेकर, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते.

मुलांचा वाजतगाजत घोडा गाडीतून प्रवेश करण्यात आला. पहिलीतील मुलांचे पाऊल उमटून तसेच फुले उधळून स्वागत करण्यात आले. मुलांसाठी खास सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow