T20 World Cup 2024, USA vs IRE : पावसानं पाकिस्तानचा खेळ बिघडवला; अमेरिका सुपर 8 मध्ये, पाकिस्तान स्पर्धेबाहेर

Jun 15, 2024 - 11:39
 0
T20 World Cup 2024, USA vs IRE : पावसानं पाकिस्तानचा खेळ बिघडवला; अमेरिका सुपर 8 मध्ये, पाकिस्तान स्पर्धेबाहेर

फ्लोरिडा : भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचं (Pakistan Ruled Out of World Cup) स्पर्धेतील आव्हान संपलं आहे.

अमेरिकेचा संघ (USA Enterd In Super 8)आयरलँड विरुद्ध एकही बॉल न खेळता सुपर 8 मध्ये दाखल झाला आहे. अमेरिका विरुद्ध आयरलँड यांच्यातील मॅच खराब वातावरणामुळं आणि पावसामुळं रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आल्यानं पाकिस्तानची सुपर 8 मधील प्रवेशाची अखेरची आशा देखील संपली आहे. बाबर आझमच्या नेतृत्त्वातील पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अ गटातून भारत आणि अमेरिका सुपर 8 मध्ये दाखल झालं आहे. आतापर्यंत सुपर 8 मध्ये सहा संघ दाखल झाले आहेत.

पाकिस्तान स्पर्धेबाहेर

फ्लोरिडातील पाऊस आणि पूरस्थितीचा फटका तिथं होणाऱ्या सामन्यांना बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज देखील पाऊस सुरु असल्यानं अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच वेळेवर सुरु होऊ शकली नाही. अखेर पंचांनी आणि मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी मैदानाची पाहणी केली आणि वातावरणाचा आढावा घेतला. पावसाची शक्यता पुन्हा निर्माण झाल्यानं अखेर मॅच रद्द करत दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आले. यामुळं अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला फटका बसला. अमेरिकेच्या नावावर आता 5 गुण जमा झाला आहेत. पाकिस्तानची एक मॅच शिल्लक राहिल्यानं त्यांना या गुणांची बरोबरी करणं अशक्य झाल्यानं त्यांचा यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपला आहे.

पाकिस्तानची आयरलँड विरुद्ध 16 जूनला मॅच होणार आहे. मात्र, या मॅचमध्ये पाकिस्ताननं विजय मिळवला तरीते अमेरिकेची बरोबरी करु शकणार नाहीत. परिणामी आजचं पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

बाबर आझमच्या संघाला निसटते पराभव महागात पडले

बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला पहिल्या मॅचमध्ये अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी हातात आलेली मॅच गमावली. भारताविरुद्ध त्यांनी 6 धावांनी पराभव स्वीकारला. याशिवाय पाकिस्ताननं कॅनडाला पराभूत केल्यानं त्यांच्या नावावर दोन गुण जमा झाले होते. मात्र, अमेरिका विरुद्ध आयरलँड मॅच रद्द झाल्यानं पाकिस्तानच्या सुपर 8 मधील प्रवेशाच्या आशा देखील संपल्या आहेत. आशिया खंडातील श्रीलंका आणि पाकिस्तान हे दिग्गज संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत. दुसरीकडे अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. तर, बांगलादेश देखील सुपर 8 च्या शर्यतीत आहे. भारतानं अगोदरचं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow