दापोलीत गरोदर मातेचा पोटातील अर्भकासह मृत्यू; घटनेने खळबळ

Jun 15, 2024 - 12:04
Jun 15, 2024 - 13:24
 0
दापोलीत गरोदर मातेचा पोटातील अर्भकासह मृत्यू; घटनेने खळबळ

जालगाव : श्वास घ्यायला त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या गरोदर महिलेचा तिच्या पोटातील बाळासह उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे शुक्रवारी दि. १४ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गरोदर महिला सायली सनी नांगे (२७ खेड सुकवली (सध्या रा. फॅमिली माळ, दापोली) ही महिला ८ महिन्यांची गरोदर होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या महिलेवर उपचार सुरू असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. याबाबतची खबर तिचे पती सनी नांगे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून, या घटनेचा अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow