आंबोली घाटात अस्वच्छता केल्यास १ हजारांचा दंड

Jun 15, 2024 - 14:39
 0
आंबोली घाटात अस्वच्छता केल्यास १ हजारांचा दंड

सावंतवाडी : वर्षा पर्यटनाच्या पाश्र्वभूमीवर वनविभाग सर्तक झाले असून आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्या ना दणका देण्याचे ठरविले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आंबोली घाटात अस्वच्छता केल्यास किंवा माकडांना खाऊ घातल्यास १ हजार रुपयांचा दंड उपद्रव शुल्क म्हणून वसूल करण्याचे वनविभागाकडून निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी आज शनिवार पासून करण्यात येणार आहे.आंबोली घाटात शुक्रवारी वनविभाग तसेच वनसमिती ग्रामस्थ याच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मोठ्याप्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.हा मोठ्याप्रमाणात साठलेला कचरा बघून सर्वानाच धक्का बसला त्यामुळे वनविभागाकडून यांची गंभीर दखल घेत आंबोली घाटात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना कचरा टाकणारयावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

यात वनविभागाकडून परिपत्रक काढले असून याबाबतची अंमलबजावणी शनिवार 15 जून पासून करण्यात येणार असून यात वनक्षेत्रात जमीन, नद्या, पाणवठे व इतर जलस्त्रोतांचे दूषितिकरण केल्यास कचरा प्लास्टिक टाकताना आढळल्यास १ हजार रुपये दंड वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देणे तसेच वन्य प्राण्यांसोबत छेडछाड करताना आढळल्यास १ हजार रुपये दंड, मद्यपान करणे, मद्यपान बाळगणे १ हजार रुपये दंड आणि धुम्रपान करताना आढळून आल्यास ५०० रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

तर वरील घटना संबंधी व्यक्तींकडून दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास वन नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.हे परिपत्रक उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडून काढण्यात येणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow