महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या तृतीय वर्ष BCA चा निकाल १०० टक्के

Jun 15, 2024 - 16:53
Jun 15, 2024 - 16:58
 0
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या तृतीय वर्ष BCA चा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे, महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी, हे एस.एन. डी . टी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेले कॉलेज आहे. १९९९ पासून सुरु झालेल्या कॉलेजने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा सतत चालू ठेवलेली असून ह्या वर्षी तृतीय वर्ष B.C.A चा निकाल १००% लागलेला आहे. 

यामध्ये प्रथम क्रमांक कु. आदिती साळवी ७५.९% , द्वितीय क्रमांक ७५.८%, तृतीय क्रमांक मैथिली कीर ७१. ८% गुण  मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. ५ विद्यार्थिनी विशेष श्रेणी, १९ विद्यार्थिनी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. 

BCA ह्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रोग्रामिंग लॅग्वेज, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, वेब डिव्हलपिंग या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाते. ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थिनींना संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्लिश स्पिकिंग तसेच आंतरराष्ट्रीय जर्मन भाषा यांचे देखील प्रशिक्षण महाविद्यालया तर्फे मिळाले  आहे. त्याचबरोबर  विद्यार्थिनींना एस.एन. डी . टी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त महाविद्यालयातर्फे शिकवल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर टेस्टिंग, हार्डवेअर नेटवर्किंग, मल्टिमिडीया आणि ऍनिमेशन या विविध कोर्सेस चे प्रशिक्षण मिळाले आहे. ह्या विद्यार्थिनींना तृतीय वर्ष BCA मध्ये शिक्षण घेत असताना गद्रे इन्फोटेक प्रा . तर्फे महाविद्यालया मार्फत इंटर्नशिप साठी संधी मिळाली होती.

ह्या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उप कार्याध्यक्षा तसेच रत्नागिरी प्रकल्पाच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंतदेसाई, प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, संस्थेचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:22 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow