पावस येथील कारखान्याच्या कार्यालयात चोरी

Jun 17, 2024 - 11:51
 0
पावस येथील कारखान्याच्या कार्यालयात चोरी

◼️ परिसरातील दहा दिवसातील चौथी चोरी

पावस : पावस येथील देसाई फॅक्टरीच्या कार्यालयाचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करून तेथील तीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याने अज्ञाताविरुद्ध पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या परिसरातील दहा दिवसातील चौथी चोरी आहे. त्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण म्हणजे असून पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. दि. १६ जून रोजी रात्री दीड ते अडीच या दरम्यान पावस येथील अमर देसाई यांच्या फॅक्टरीमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये कटावणीच्या सहाय्याने ग्रील तोडून तिघाचोरट्याने प्रवेश केला. याबाबत पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow