चिपळूण : कुंडल येथे पहिली वनवृत्त वन अधिकारी परिषद संपन्न

Jun 17, 2024 - 12:07
 0
चिपळूण :  कुंडल येथे पहिली वनवृत्त वन अधिकारी परिषद संपन्न

चिपळूण :कोल्हापूर येथील वनसंरक्षक रामानुजन यांच्या संकल्पनेतून पहिली वनवृत्त वन अधिकारी परिषद कुंडल येथे झाली. यामध्ये विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या परिषदेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सावंतवाडी, चिपळूणमधील वन अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी जिल्ह्यातील वड या वृक्षाची पुनर्रचना तसेच स्टंप लागवड व संवर्धन, वणवा प्रतिबंध उपाय व कायदेशीर तरतूद, खवले मांजर बचाव मोहीम, कासव संवर्धन केंद्र यांचे सादरीकरण करण्यात आले. रत्नागिरी (चिपळूण) वन विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील कासव संवर्धन केंद्र, मगर सफारी, वन्यप्राणी रेस्क्यू या बाबतच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजश्री कीर व वनक्षेत्रपाल फिरते पथक रत्नागिरीचे वैभव बोराटे यांनी माहितीचे सादरीकरण केले. या परिषदेत वन कायदा व त्यामधील बदल यासंदर्भात धोंगडे व भुर्के यांनी मार्गदर्शन केले. कुंडल जवळ असलेल्या यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य देवरास्ट्रे या ठिकाणी भेट देऊन तेथील चितळ, सांबर, काळवीट या वन्यप्राणी व्यवस्थापन विषयी माहिती घेण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow